नेहमी चुकी करतांना स्वतःला थांबवा कारण लोक तुमचे सगळे तुमचे सगळे चांगले काम एक चूक केल्यामुळे लगेच विसरतात ..

346

राजमहालात उत्सव चालला होता. सगळेच नृत्याचा आनंद घेत होते, पण तेवढ्यात तबला वाजवणाऱ्याला झोप यायला लागली. ते बघून नर्तकी असे काही बोलली की, त्याने सगळ्यांचे डोळे उघडले.

आपण माणूस आहोत आणि सहसा आपल्याकडून चुका होत असतात. तुम्ही कितीही चांगले असला तरी तुमची एक चूक तुमच्या चांगलेपणावर पडदा टाकते. चुकून पण असे काम करू नये, ज्याने चांगलेपणा एका क्षणात संपुन जाईल. लोक वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि चांगल्या गोष्टी लगेच विसरून जातात. ह्यापासून आपण वाचलं पाहिजे. ही गोष्ट आम्ही तुम्हाला कथा रूपात समजून सांगतो.

नृत्य करणारीने वाचला हा दोहा :- 

एकेकाळी एक राजा होता. तो बराच वयस्कर झाला होता. त्याला पत्नी व दोन मुलं होते. एक दिवस दरबारात कसलातरी आनंदाचा क्षण होता. त्या उत्सवात एक नाचणारी बोलावली गेली. या उत्सवात राजाचा पूर्ण परिवार, गुरू, प्रजा आणि बरेच लोक सहभागी होते. रात्रभर संगीत चालत राहील आणि नर्तिका नाचत होती. नृत्य बघून राजा आणि प्रजा रात्रभर खुश होते. सकाळपर्यंत कार्यक्रम चालला होता.

जेव्हा सकाळ व्हायला लागली तेव्हा तबला वादकाला झोप यायला लागली. राजा तबला वादकवर भडकायला नको म्हणून नृत्य करणारीने एक दोहा म्हटला –बहु बीती, थोड़ी रही, पल पल गई बिहाई एक पलक के कारने ना कलंक लग जाई

हा दोहा ऐकताच तबला पुन्हा वाजायला लागला. तिथे प्रत्येकाने त्या डोह्याचा वेगवेगळा अर्थ काढला. सगळ्यात पाहिले राजाचे गुरू उठले व तबला बंद केला आणि मग नाचणारी जवळ जाऊन तिचे पाया पडले. गुरू म्हणाले, हे नर्तकी तू माझी गुरू आहेस. मी आयुष्यभर देवाची भक्ती केली आणि वृद्धापकाळात देवाला सोडून नाचगाणी बघायला आलो, तू माझे डोळे उघडलेस.

राजाच्या मुलीने तिचा नवा कोरा हार नाचणारीला दिला. मुलगी म्हणली, मी एका साधारण मुलावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत पळून जाणार होती. पण तू या दोह्यातून मला सांगितलं की, जाता जाता मी माझ्या वडिलांना कलंकित करायला नको. मुलाने आपला मुकुट काढून नाचणारीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला की, मला राजपदाची लालच लागली होती आणि मी वडिलांची हत्या करणार होतो.

असा मिळाला पूर्ण राज्याला बोध :-

राजकुमार म्हणाला की, तू मला शिकवलं की काही वेळेची गोष्ट आहे नंतर हे सगळं राज्य माझंच होणार आहे. वडिलांची हत्या करण्याचा नीच अपराध मी करायला नको. राजाने या सगळ्या गोष्टी ऐकून आपला राजमुकुट नाचणारीला देऊन दिला आणि म्हणाला की, तू या राज्याला एकसोबत इतक्या लोकांना इतकी मोठा धडा दिला खरतर राज्य करणे तुला येते. मी आजच माझ्या मुलाचा राजाभिषेक करवतो आणि जो साधारण व स्वतः मेहनत करून कमवणारा मुलगा आहे त्याच्याशी मुलीचे लग्न लावून देतो.

इतका सन्मान मिळाल्यावर नाचणारी म्हणाली, माझ्या एका दोह्याने आपण इतके लोक सुधारले. आजपासून मी माझे हे काम बंद करते. आजपासून मी फक्त देवाचे नाव घेत जाईल. या कथेतून सगळ्यांना बोध मिळाला की, जेव्हा कुठला प्रयत्न असताना मन भटकले तरी कुठलेच चुकीचे काम केले नाही पाहिजे, ज्याने आपल्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल. Source :-