जगातील 10 सत्य ज्यांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत !

1440

जगातील 10 सत्य ज्यांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत, जाणून घ्या. विज्ञानाने किती संशोधन केले असतील पण, जगात अशा काही वस्तू आणि गोष्टी आहेत जी अजुनही एक गूढ आहेत. भल्या-भल्या संशोधकांना लाख प्रयोग करूनही त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत. अशाच 10 रहस्यांबद्दल आज आम्ही चर्चा करत आहोत. या अशा गोष्टी आहेत की ज्या अजुनही प्रश्नच आहे.

स्वप्न कसे येतात?
झोप आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. मात्र, झोपल्यानंतर स्वप्न कशी येतात. याचे उत्तर अजुनही मिळालेले नाही.
स्वप्नांवर अनेक प्रकारच्या अख्यायिका आणि मिथक आहेत. पण, त्याचे सत्य कुणीही सिद्ध करू शकलेले नाही.
झोपेत डोक्यात चालणाऱ्या कल्पना हेच स्वप्न आहे. झोपेत जे विचार येतात तेच समोर दिसते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला झोपताना ऑफिसची चिंता असेल तर त्याला ऑफिसची स्वप्ने येतात.
काहींच्या मते, प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत. ते आपण स्वप्नात साकार झाल्याचे पाहतो. मनात दबलेल्या भावना स्वप्नात दिसून येतात.
धार्मिक मान्यतेनुसार, स्वप्न आपल्या जीवनात घडणाऱ्या बऱ्या-वाइट गोष्टींचे भाकित असते. मात्र, वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलेले नाही.

एका व्यक्तीच्या बोटांचे ठसे दुसऱ्या व्यक्तीच्या बोटांच्या ठशापासून वेगळे का असतात. विशेष म्हणजे, एकाच व्यक्तीच्या विविध बोटांचे ठसे सुद्धा एकमेकांशी मॅच होत नाहीत.

पृथ्वीच्या दोन चुंबकीय क्षेत्र आहेत. ऊर्जा कुठून मिळते हे अजुनही गूढ आहे.

दररोज अनेकांना जांभई येत असते. पण, ती नेकमी का येते हे कुणालाच माहिती नाही.

ब्रह्मांडातील सर्वात मोठे रहस्य ब्लॅकहोल. आतापर्यंत ब्लॅकहोलचा फोटो सुद्धा काढण्यात आलेला नाही. जेवढे आहेत, ते ग्राफिक्स आहेत. यांच्यातील गुरुत्वाकर्षण इतके शक्तीशाली आहे की त्यातून प्रकाश सुद्धा बाहेर येऊ शकतन नाही असे म्हटले जाते.

झोप मेदूची एक क्रिया आहे. पण, ती नेमकी कशी लागते हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

पृथ्वीचा मधला भाग सॉलिड आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. पण, ते अजुनही सिद्ध करता आले नाही.

मानवी मेंदू आयुष्यभर वेगवेगळ्या गोष्टी सेव्ह करतो. गरजेनुसार, त्या आपल्याला आठवतात. ही प्रक्रिया अजुनही एक रहस्य आहे.

न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पण, गुरुत्वाकर्षण कसा आणि का असतो हे अद्याप सिद्ध झाले नाही.

मृत्यूनंतर नेमके काय होत असले?