सिताफळाचे हे आहेत अनेक फायदे जाणून घ्या..

2092

अॅसिडीटी कमी होते
अनेकांना अॅसिडीटीची समस्या असते. सगळे त्यावर अनेक उपाय शोधक असतात. सिताफळ हे अॅसिडीटीसाठी खूप उपायकारक आहे. आम्लपित्त अरुची शरीरात उष्णता जाणवणे छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे.

भीती किंवा धडधड वाटत असेल तर सिताफळ उपयुक्त
ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.

अशक्तपणा कमी होतो
आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.

केसांसाठी उपयुुक्त
काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे केस पांढरे होणे टक्कलपणा या समस्या वाढतात हल्ली जगातील अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहेत यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे सीताफळ या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात. केस गळण्याचे प्रमाण अधिक असेल तर सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधात उगाळून लावा नवीन केस उगवतील.

तोंडावरचे फोडं कमी होतात
सीताफळाच्या पानांचा लेप फोडांवर लावल्यास ते ठीक होतात अनेकांना तोंडावरील फोडाची समस्या असते त्यामुळे सीताफळाचा लेप खूप फायदेशीर ठरतो.

हाय ब्लडप्रेशर
उच्च रक्तदाब तसेच हद्यरोगाच्या पेशंटनी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते.
रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्ससारखे अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.