स्त्रीयांच्या कोणत्या गोष्टीमुळे पुरूष होतात वेडेपिसे जाणून घ्या ?

1388

आपण आपल्या पतीला किंवा बॉयफ्रेंडला खुश ठेऊ की नाही. याबाबत अनेक मुली, महिला सतत विचार करत असतात. कारण त्यांना मुले, पुरूष कशामुळे इंप्रेस होतात किंवा खूश राहतात याबाबत माहित नसते. त्यासाठी काही सोप्याच पण महत्त्वाच्या गोष्टी कराल तर, तुम्ही आपल्या पतीला, बॉयफ्रेंडला नक्कीच खुश ठेऊ शकता.

पुरूषांना असे बनवा दिवाने

मध्यरात्री कॉल करा

स्त्रीयांप्रमानेच पुरूषही प्रेमाचे दिवाने असतात. मात्र, दिवसभरात ते इतर गोष्टींमध्ये व्यग्र असतात. म्हणून तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. पण तुम्ही जर मध्यरात्री फोन करून, त्याची ‘नींद चूरायेंगे तो बात बन जायेगी’. मध्यरात्री त्याच्याशी फोनवर बोलताना जानू, आय लव यू, मला तुझी खूप आठवण येतीय, असे जर म्हणाल तर तो तुमच्यासाठी पागल झालाच म्हणून समजा.

बोलणे काळजीपूर्वक ऐका

म्हटले तर ही गोष्ट एकदम सोपी आहे. पण, अनेक महिलामंडळाचे गाडे ईथेच आडते. आपल्या साथीदाराचे म्हणणे त्याच्या हातात हात घालून तुम्ही जर शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐकाल तर, तुम्हाला त्याला खूश ठेवण्यासाठी विशेष काही करावे लागणार नाही. कारण, तुम्ही त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकता ही गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. महिलांचे हे वर्तन रिलेशनशिप आणि प्रेम मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.

काळजी घ्या

ऑफिसमधले काम, आर्थिक जबाबदाऱ्या, वृद्ध आईवडीलांचा सांभाळ, संसार आदि गोष्टींमुळे पुरूषाला मानसीक थकवा आलेला असतो. या सगळ्यात त्याला फक्त त्याची पार्टनरच सांभाळून घेऊ शकते, असे त्याला वाटते. अशा वेळी तो जवळ आल्यास त्याच्याशी प्रेमाने बोला. त्याला आपल्या मिठीत घ्या, त्याच्या केसांतून हलकासा हात फिरवा, असे केल्याने त्याचा थकवा दूर होतो. तुमच्या प्रेमाने तो तुमच्या अधिक जवळ येतो. त्यामुळे प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते.

मिठी मारून आश्चर्यचकीत करा

अचानकपणे मिठी मारून त्याला आश्चर्याचा धक्का द्या. कधी कधी त्याला व्यक्त होता येत नाही. अशा वेळी तुम्ही त्याला मिठीत घेऊन थक्क करा. तुमची ही गोष्ट त्याला खूप आनंद देऊन जाते.

अशा गोष्टी केल्याने विश्वस आणि प्रेम दोन्ही दृढ होऊन नाते मजबूत होते.  छोट्या छोट्या आणि साध्याच गोष्टींमुळे पुरूष महिलांचे दिवाने होतात.