कामात मन लागत नाहीये, एकाग्रता भंग झालीये ? मग हे करा.

1277

कामावरचे लक्ष उडणे, लक्ष केंद्रीत न होणे ही एक सामान्य समस्या आहे, मात्र याचे दुरगामी परिणाम बघायला मिळतात. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आणि एकाग्रता साधण्यासाठी आपण काही उपाय योजू शकतो.

कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला नेमके काय करायचे आहे हे ठरवा. डेडलाईन्सप्रमाणेही कामाची आखणी करता येईल.

सोशल मीडिया आणि ई मेल चेक करण्याची ठराविक वेळ ठरवा. व्हॉट्स अँप चॅट्स किंवा फेसबुक सतत बघू नका. यामुळे कामावर परिणाम होतो.

एका वेळी अनेक गोष्टी करू नका. कामाची विभागणी करा. यामुळे गोंधळ उडणार नाही.

कधी घरून काम करणे ठीक आहे. पण नव्या कल्पना लढवण्यासाठी कॅफेमध्ये बसून काम करा. जागा एकसारखी बदलू नका.

कामासाठी शांत जागा शोधा. गडबड-गोंधळ असणार्‍या ठिकाणी काम चांगले होत नाही.

डेस्कची स्वच्छता करा. बिस्किटांचे कागद, कॉफीचे मग तसेच ठेऊ नका. यामुळे उत्साह कमी होतो.

स्वत:साठी वेळ काढा. स्वत:ला आवडणार्‍या गोष्टी करा. छानसा चित्रपट बघा. छंद जोपासा.