जीवनात यश आणि शांति मिळवण्यासाठी नक्की करा हे ६ कामे ..

1373

हिंदू धर्मात गरुड हे विष्णूचे वाहन असल्याचं सांगितलं आहे. यांच्या वडिलांचे नाव कश्यप ऋषी आणि आईच नाव वनिता आहे. आपल्या धर्मात गरुडला पक्षांचा राजा म्हटलं आहे जो की, सगळ्या पक्षांत वेगाने उडतो. आपल्या शास्त्रात गरुड पुराण आहे आणि या पुराणात असे उपाय सांगितले आहेत जे केल्याने जीवनात सफलता मिळवली जाऊ शकते.

काय लिहिलं आहे गरुड पुराणात ? :- 

गरुड पुराणात लिहिलेल्या एका श्लोकानुसार जर कुणी खाली दिलेल्या सहा गोष्टींची पूजा करत तर त्याला सुखशांती, सफलता मिळते आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या समस्या दूर होतात.

गरुड पुराणात लिहिलेला श्लोक –
विष्णुरेकादशी गंगा तुलसीविप्रधेवन:।
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।

या श्लोकात सहा गोष्टींची पूजा करण्याचा उल्लेख केला आहे. त्या आहेत भगवान विष्णू, गाय, तुळस, गंगा, पंडित आणि एकादशी व्रत. या श्लोक नुसार या गोष्टींची पूजा आणि सेवा करून आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता.

भगवान विष्णू :- 

भगवान विष्णूने या जगात अनेक अवतारात जन्म घेतला आणि लोक त्यांच्या प्रत्येक अवताराची पूजा करतात. भगवान विष्णूची सकाळ-संध्याकाळ पूजा केली पाहिजे. नेहमी भगवान विष्णू नाम घेतल्याने सगळ्या समस्या दूर होतात आणि जीवनात सफलता प्राप्त होते. म्हणून आपण रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे नाम घेऊन त्यांची पूजा अर्चना योग्य प्रकारे करावी.

गाय :- 

गायीची पूजा करण्याचा अर्थ आपण एकाचवेळी सर्व देवतांची पूजा करत असतात. गायीची सेवा करणे फार फलदायी असत आणि जे लोक गायीची सेवा करतात त्यांच्याकडून झालेल्या सगळ्या पापातून त्यांना मुक्ती मिळते. गरुड पुराणात स्पष्ट लिहिले आहे की, ज्यांना जीवनात सफलता हवी असेल त्यांनी नित्य गायीची पूजा सेवा केली पाहिजे.

तुळस :- 

तुळशीचे रोप शुभदायी असत आणि त्याला फार पवित्र मानलं जातं. आपल्या पुराणात लिहिले आहे की, अंगणात तुळस असल्याने आपले घर पवित्र राहते आणि तिची दररोज पूजा केली पाहिजे. तुळशीचे पान भगवान विष्णूची पूजा करताना पण वापरले जाते.

गंगा नदी :-  दरवर्षी लाखो लोक गंगा नदीत डुबकी मारून त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळवतात. ही नदी सर्वात पवित्र नदी आहे आणि या नदीच्या घाटांवर रोज संध्याकाळी गंगा नदीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की गंगा नदीची पूजा केल्याने जीवनात प्रचंड यश प्राप्त होते.

पंडित :-

पंडितांची सेवा करणे आणि त्यांना जेवण देणे फार पुण्याचे काम मानले जाते. म्हटलं जातं की, आपल्या घरातून कुठल्या पंडिताला खाली हात पाठवू नये. पंडितांची सेवा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्यावर येणारी सगळी संकटे दूर होतात.

एकादशी उपवास :- 

दरवर्षी अनेक प्रकारच्या एकादशी येतात आणि एकादशीला उपवास करणे उत्तम मानले जाते. एकादशी दिवशी उपवास केल्याने जीवनात येणाऱ्या समस्या सहजपणे दूर केल्या जाऊ शकतात. एकादशीला उपवास केल्याने शुभ फळ मिळते.