साक्षात् लक्ष्मीचे रूप असतात ह्या महिन्यांमध्ये जन्म झालेल्या मुली , जाणून घ्या कोणते आहे ते शुभ महिने ..

418

भारतात हिंदू लोक मुलीला देवीचे रूप मानतात. नवरात्रीत लोक कन्या पूजन करून 9 मुलींना जेवण देखील देतात. धार्मिक कथेनुसार असे केल्याने देवी फार प्रसन्न होते. शास्त्रात देखील कन्या पूजनीय असल्याचं म्हटलं आहे आणि स्त्री सुद्धा देवी लक्ष्मीचं रूप असल्याचं सांगितलं आहे. म्हणून जेव्हा पण मुलीचा जन्म होतो तेव्हा लोक म्हणतात की, ‘लक्ष्मी आली आहे’ किंवा ‘घरात लक्ष्मीचे आगमन झाले आहे’. अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार मुलगी घरात सुख-समृद्धी घेऊन येते. ज्योतिष्याशास्त्रानुसार मुलीच्या जन्मसोबत त्यांचा जन्म महिना देखील फार भाग्यशाली असतो.

या महिन्यात जन्मलेल्या मुली फक्त नशीबवानच नसतात तर त्यांना सासर फार चांगलं मिळत. साक्षात देवी लक्ष्मीचे रूप असतात या महिन्यात जन्मलेल्या मुली, ज्या आपल्या सासरसाठी पण समृद्धीचे कारण बनतात.

साक्षात लक्ष्मीचे रूप असतात या महिन्यात जन्मलेल्या मुली

फेब्रुवारी

फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव विनम्र असतो आणि त्या फार बुद्धिमान ही असतात. या मुलींना लग्नानंतर चांगलं घर मिळत. सोबतच त्या आपल्या घरात सुख-समृद्धी आणतात. यांच्या ग्रहाची चाल यांच्या कुटुंबाला फायदा करून देते.

एप्रिल

या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींना साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानलं जातं. शास्त्रानुसार हा महिना फार शुभ मानला जातो. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींच्या ग्रहाची चाल फार वेगवान असते ज्यामुळे त्यांना यश प्राप्त होते. यांच्या नशिबाच नाणं खणखणीत असत.

जून

जून महिन्यात जन्मलेल्या मुली भाग्यशाली असतात. अंक शास्त्रानुसार या महिन्यात मुलं जन्मने शुभ मानले जात नाही पण मुलगी जन्माला आली तर ती साक्षात देवी लक्ष्मीच रूप असतात. या महिन्यात जन्मलेल्या मुली फार मेहनती असतात, त्या आपले लक्ष्य गाठण्यासाठी फार मोठी मेहनत घेतात.

सप्टेंबर

या महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या कुंडलीत चंद्र, बुध आणि शुक्र तिघांच मिलन असत. त्यामुळे या महिन्यात जन्मलेल्या मुली फार धनवान असतात. त्या आपल्या भाग्याने सगळं काही प्राप्त करतात. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नसते. आणि या मुलींचे लग्न सुद्धा पैशावाल्या मुलाशी होते.

source :- Newstreand