शिग्रपतण एक लैंगिक समस्यां; तरुणांनी जरूर पहा त्यावरील उपयुक्त घरगुती उपाय !

1405

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन असं म्हणतात की साधारणत संभोग 3-5 मिनिटे चालतो अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.

शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत सेक्सविषयी भीती अति आतुरता कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल तसंच ऑरगॅझम कधी येतो त्याआधी शरीरात मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.
स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो या स्वाभाविक क्रिया आहेत मुलं-मुली स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात जोपर्यंत स्वतःला दुखापत होत नाही किंवा रोजच्या कामात अडथळा येत नाही तोपर्यंत हस्तमैथुनात काही धोका नाही.

मुलांनी हस्तमैथुन करू नये यासाठी पसरवलेला हा मोठा गैरसमज आहे हस्तमैथुन केल्याने लिंग वाकडं होत नाही. मात्र हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लिंगाला इजा होऊ शकते ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
पुरुषाच्या शरीरात हृदयाच्या एका ठोक्याला किमान 1000 पुरुष बीजं तयार होत असतात. ती बाहेर पडण्यासाठी वीर्यकोषांमध्ये वीर्य तयार होतं. लैंगिक भावना निर्माण झाल्या किंवा लैंगिक क्रिया केल्यावर ते लिंगातून बाहेर पडतं आणि नव्याने वीर्य तयार होतं.

वीर्य सतत तयार होत असतं आणि ते साठवून ठेवता येत नाही.
स्वप्नदोष हा शब्दच मुळात वापरणं थांबवलं पाहिजे. किशोरवयामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे.