काय उन्हाळ्याच्या दिवसांत अंडे खाणे शरीरासाठी खराब असते ?

436

अंडे खाणे शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सगळेच जाणतात. पण तरीही अनेक लोक उन्हाळ्यात अंडी खायचे बंद करतात. कारण त्यांना वाटत की, उन्हाळ्यात अंडी खाणे शरीरासाठी चांगलं नसत. पण लोकांचे असे विचार एकदम चुकीचे आहेत आणि ते उन्हाळ्यातही खाल्ले जाऊ शकतात. पण उन्हाळ्यात ते खातांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

ताकदवान असतात अंडी :-

अंड्यात अधिक प्रमाणात क्लशियम आणि आयर्न असते त्यामुळे अंडी फार ताकदवान समजली जातात. म्हणून प्रत्येकाला रोज किमान एक अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. कुठल्याही प्रकारचा आजार झाल्यास डॉक्टर अंडे खाण्यास नक्की सांगतात. कारण अंडे खाल्ल्याने एकाच वेळी अनेक पोषक तत्वे शरीराला मिळतात. अंडी इतकी आरोग्यदायी असूनही उन्हाळ्यात ते खाण्याचा प्रश्न लोकांच्या मनात येतो. काही लोक फक्त ते हिवाळ्यात खातात आणि उन्हाळा लागताच खायचं बंद करतात.

उन्हाळ्यात अंडी खाल्ली पाहिजेत का ? :-

जे लोक उन्हाळ्यात अंडी न खाण्याचं ठरवतात ते एकदम चुकीचं आहे. कारण आपण ते जसे हिवाळ्यात मजेने खाऊ शकतो तसेच उन्हाळ्यात ही खाऊ शकतो. उन्हाळ्यात खाल्ल्याने त्याने कुठल्याही प्रकारचे नुकसान शरीराला होत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात अंडी खाल्ली जाऊ शकतात. फक्त ते अति प्रमाणात न खाता योग्य मात्रात खावेत. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते त्यामुळे हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण उन्हाळ्यात अंडी खाऊ शकता पण, ते दिवसाला दोन पेक्षा अधिक खाऊ नये. जर आपले शरीर उष्ण राहत असेल तर आपण दिवसाला एकच किंवा एक दिवसाआड खावे.

कोणत्या वेळी खावे अंडी ? :-

उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही ऋतूत अंडी सकाळीच खाणे योग्य असते. म्हणून आपण अंडी नाष्टात खाल्ली तर त्याचा फायदा जास्त होईल. उकळलेले अंडे शरीरासाठी जास्त फायदेशीर मानलं जातं. जर आपल्याला कच्चं अंड सहजपणे पचत असेल तर आपण कच्चंही खाऊ शकता. कारण कच्चं अंड फार जड असत आणि पचायला ही जड जात. म्हणून अंडी थोडी काळजीपूर्वक खावी.

source :- NewsTreand