महिला लग्नानंतर परपुरूषाकडे आकर्षित होण्याची कारणं जाणून घ्या !

2305

लग्नानंतर स्त्रिया परपुरूषाकडे आकर्षित होण्याची कारण 

1) एखाद्या मुलीचं तिच्या पसंतीविरूध लग्न झालं असल्यास किंवा तिच्या आयुष्यातील व्यक्तीव्यतिरिक्त इतरांसोबत लग्न करण्याचा दबाव असल्यास ते प्रेम पुन्हा जाणवू लागतं. आयुष्यात जबरदस्तीने दुरावलेल्या प्रेमाकडे एखादी स्त्री सहाजिकच पुन्हा जाऊ शकते.

2) स्त्रीला जर तिच्या साथीदाराकडून पुरेसा वेळ किंवा प्रेम मिळत नसेल तर त्याचा परिणाम नात्यावर सहाजिक उमटू शकतो. अशावेळेस परपुरूषाकडून मिळणार्‍या अटेंन्शनकडे त्या खेचल्या जाऊ शकतात.

3) स्त्रियांच्या भावनात्मक पातळीवर होणारी कुचंबनादेखील स्त्रियांना त्रासदायक ठरते. साथीदाराकडून भावनिक अपेक्षा पूर्ण होत नसतील तर त्या इतर व्यक्तीकडे मन हलकं करण्यासाठी पर्याय शोधू शकतात. यामधूनच अफेअर होण्याची शक्यता असते.

4) अनेकदा महिला त्यांच्या साथीदाराकडून योग्य वागणूक किंवा प्रेम मिळत नाही म्हणून त्याचा बदला घेऊ शकतात. अशावेळेस मनात बदला घेण्याची भावना निर्माण झाल्यानंतर त्या साथीदाराव्यतिरिक्त परपुरूषासोबत अधिक वेळ घालवतात.

5) जेव्हा साथीदाराकडून असलेल्या अपेक्षा कोणत्याच पातळी पूर्ण होत नाही अशावेळेस सहाजिक त्या परपुरूषाकडे आकर्षित होऊ शकतात.